आजचं राशिभविष्य…..

मेष कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. शासकीय सेवेत नियमबाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भभवतील. कुटुंबापासून विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल.

वृषभ नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. अनपेक्षित आर्थिक लाभही संभवतो. मात्र, अतिआत्मविश्वास आणि अतिउत्साहीपणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. पत्नी साथीदारांच्या कामावर लक्ष असू द्या.

मिथुन आज चांगली फले मिळतील. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. यश मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. जुन्या परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील.

कर्क सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. नोकरी परिश्रमाचा पूर्ण मोबादला मिळेल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. प्रगतिकारक दिवस आहे. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा.

सिंह राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दूरचा प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल.

कन्या अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी.

तूळ व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकांना मात करू शकाल. दुसर्‍याला जामीन राहू नका. अन्यथा फसवणूक किंवा आर्थिकहानी होण्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे.

वृश्चिक शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी, समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. व्यसनी मित्रांपासून दूर राहा. आपल्या विरोधात काहुर उठेल.

धनु नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. अनावश्यक चिंतेपासून दूर राहा. देणे-घेणे सावधानता बाळगा. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होतील. व्यापार-व्यवसायात दिवस फायदेशीर राहील. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील.

मकर सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल.घरासंबंधी समस्या दूर होतील.आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत. व्यापारात साथीदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. शारिरिक कामात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा. काही विशेष कामानिमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे बेत आखावे लागतील.

कुंभ कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखकवर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती मिळेल. कर्तुत्व सिद्ध करू शकाल. हातून विधायक कार्य घडेल. अतिरिक्त कामानुन उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

मीन आज व्यवहार चातुर्य आणि संयमी भूमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होणार आहे. योग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल.

🤙 8080365706