सकल हिंदू समाजाच्या वतीने कागल शहरांमध्ये भव्य शोभायात्रा

शोभायात्रेचे मुख्य आकर्षण….

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व प्रभू श्रीराम यांची नऊ फूट उंचीची प्रतिकृती

अबाल वृद्ध व तरुणांची मोठी गर्दी

कागल: श्री राम नवमी निमित्त कागल शहर सकल हिंदू समाज यांच्यावतीने कागल शहरांमध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व प्रभू श्रीराम यांची नऊ फूट उंचीच्या देखण्या प्रतिकृती व प्रभू श्रीराम श्री लक्ष्मण व सीतामाई यांचा सजीव देखावा. विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष बंडा साळुंखे यांच्या हस्ते श्रीराम मंदिर या ठिकाणी सामुदायिक आरती करण्यात आली. यावेळी श्री राहुल कोरे कागल तालुका बजरंग दल अध्यक्ष राहुल भुरले ,निखिल मोदी, आबा हवलदार, पप्पू कुंभार, सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमंत राजे समरजीतसिंह घाटगे यांनी या शोभा यात्रेस उपस्थिती लावूनयात्रेची शोभा वाढवली.

या शोभायात्रेच्या मिरवणुकी दरम्यान पारंपारिक वाद्य व मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखविण्यात अमाप उत्साहात डॉल्बीच्या तालावर तरुणाई, थिरकली. छत्रपती शिवाजी महाराज चौक एस टी स्टॅन्ड येथून शोभा यात्रेस सुरुवात झाली. व निपाणी वेस कागल छत्रपती शंभुराजे या ठिकानी समाप्त झाली.शोभा यात्रा गहिनीनाथ गैबीपीर चौकात जाताच श्री गहिनीनाथ चौक व हनुमान मंदिर येथे सामुदायिक हनुमान चालीसाचे पठण करण्यात ही करण्यात आले.

विशेष म्हणजे सर्व सकल हिंदू समाज यांच्या वतीने रस्त्यावर खाली बसून हनुमान चालीसा पठण केले.शोभा यात्रेस शहरातील सकल हिंदू समाजाचे सर्व पदाधिकारी यांच्यासह सर्व समाजाच्या युवक बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन घेतला. कागल शहरात प्रथमच पार पडलेल्या या शोभा यात्रेत दहा हजार हून अधिक युवकांनी सहभाग घेतला.

🤙 8080365706