शरद पवार आणि नितीन गडकरी यांची भेट ; चर्चांना उधान

नागपूर : आज नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी पोहोचले आहेत. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवस नागपूरच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळीच त्यांचं नागपूर नागपूर विमानतळावर आगमन झाले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शरद पवार हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांची बैठक सुरू आहे. यावेळी त्यांच्यासोबत अनिल देशमुखंही सोबत आहेत.

🤙 8080365706