
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने हवामानत बदल जाणवत आहेत. कधी थंडी तर कधी कडाक्याचं ऊन तर कधी ढगाळ वातावरण. अशा परिस्थिती असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात आजपासून पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहिल. तसेच काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 6 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील बुलडाणा, वर्धा आणि नागपूर हे जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.
