फराळे पैकी दुधगंगानगर येथील आरोग्य उपकेंद्र लिंगाचीवाडी येथे स्थलांतर करण्यास मान्यता : आमदार प्रकाश आबिटकर

राधानगरी :राधानगरी तालुक्यातील मौजे फराळे पैकी दुधगंगानगर (आसनगांव) येथील आरोग्य उपकेंद्र काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये गेल्या सदरचे उपकेंद्र त्याच क्षेत्रातील फराळे पैकी लिंगाचीवाडी येथे स्थलांतर करण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राधानगरी तालुक्यातील फराळे पैकी दुधगंगानगर (आसनगांव) येथे असणारे आरोग्य उपकेंद्र हे काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये येत होते. सदर ठिकाणावरील लोकवस्ती स्थलांतरीत झाल्यामुळे सदरचे आरोग्य उपकेंद्र या भागातील अनेक गाव व वाड्या-वस्त्यांवर नागरीकांना गैर सोईचे होत होते. यामुळे सदरचे आरोग्य उपकेंद्र फराळे पैकी लिंगाचीवाडी येथे स्थलांतरीत करण्याबाबत येथील नागरीकांची वारंवार मागणी होत होती.

या मागणीची आनुषंगाने सार्वजनिक आरोग्य मंत्री नाम.तानाजी सावंत यांचेकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून सदरचे उपकेंद्र फराळे पैकी लिंगाचीवाडी येथे स्थलांतरीत करण्यास मंजूरी दिली आहे. यामुळे या भागातील नागरीकांना आरोग्य विषयक सोईसुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभगाने दि.24 मार्च, 2023 रोजी शासन निर्णय प्रसिध्द केला असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

🤙 8080365706