उंचगाव महावितरण कार्यालयाच्या दारात करवीर शिवसेना ठाकरे गटाची जोरदार निदर्शने;अधिकाऱ्यांना विचारला जाब

कोल्हापूर : उंचगाव हे विस्ताराने फार मोठे गांव असून शहरालगत असल्याने येथे कष्टकरी सर्वसामान्य कुटुंबातील नोकरदार व मोलमजूरी करणाऱ्यांची संख्या फार असून गोकुळ शिरगांव एम.आय.डी.सी. व शिरोली एम.आय.डी.सी. मध्ये काम करणारे मजूर अशी उचगांवच्या सर्व सामान्यांची ओळख! उचगांवमधील वीज वितरण शाखेतील कर्मचारी व अधिकारी यांनी मार्च महिन्याचे कारण सांगून वीज वसुली करत असताना गोर गरिबांची वीज बंद करत होते. अगदी मार्च महिन्याच्या सुरूवाती पासूनच वीज कनेक्शन तोडत होते मुळातच वीज बिले ही उशीरा ग्राहकांना मिळतात तसेच रिडींग घेणारे ही वेळाने रिडींग घेवून जातात त्यामुळे वीज बिलेही ग्राहकांना दोन ते तीन दिवस भरण्याची मुदत शिल्लक असताना मिळतात. बराच उचगांवमधील नोकरदार वर्ग पगारपुर्वी वीज बिल मिळत असल्याने वीज वितरण कर्मचाऱ्यांकडे मुदत मागत असतात पण वीज वितरणचे कर्मचारी व अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुष ठेवण्याच्या नादात गोरगरिबांचे वीज कनेक्शन कट करतात मुळातच कडक उन्हाळा असल्याने प्रत्येक घरामध्ये एखादे वयस्कर व्यक्ती असल्याने वीज कट केल्यानंतर त्या वयस्कर लोकांचे हया कडक उन्हामध्ये हाल हाल होत असतात. मा. उप कार्यकारी अभियंता हुपरी यांनी याबाबत तातडीने उंचगाव मधील कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करून यांच्यावर कडक कारवाई करावी व त्यांच्या मनमानी कारभारावर आळा घालावा.आज आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वतीने निदर्शने केली आहेत. याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल याची वीज वितरण कंपनीने नोंद घ्यावी. यावेळी शिवसैनिकांनी उंचगाव महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला.

यावेळी शिवसैनिकांनी उंचगाव महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर अधिकारी निरुत्तर झाले. या मागणीचे निवेदन करवीर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मा.रामेश्वर कसबेकर, उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, हुपरी व मा.रघुनाथ लाड,सहाय्यक अभियंता,उंचगाव महावितरण कार्यालय यांना देण्यात आले. यावेळी गांधीनगर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, उपतालुकप्रमुख दिपक पाटील, शिवप्रतिष्ठानचे शरद माळी, उपतालुकाप्रमुख राहुल गिरूले, फेरीवाला संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास जाधव, उपतालुकाध्यक्ष बाळासाहेब नलवडे, उंचगाव गावप्रमुख दिपक रेडेकर, ग्रा.पं.सदस्य अरविंद शिंदे, योगेश लोहार, बाबुराव पाटील, सूरज इंगवले, आकाश रुकडीकर, संदीप दळवी, बंडा पाटील, विशाल सूर्यवंशी, अजित चव्हाण, अजित पाटील, सुनिल चौगुले,दिपक अंकल, दिपक पोपटाणी, किशोर कामरा, सुनील पारपाणी, दत्तात्रय विभुते आदी उपस्थित होते.

🤙 8080365706