केएमटी कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका… कोल्हापुरात बेमुदत संप

कोल्हापूर : कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

या संपामुळे सकाळपासून केएमटी सेवेवर परिणाम झाला आहे. सर्वच केएमटी बसेस वर्कशॉपमध्ये थांबून आहेत. त्यामुळे शहरातील सार्वजनिक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

संपकरी कर्मचारी वर्कशॉपमध्ये जमले आहेत. प्रशासनाच्या ठाम आश्वासनाशिवाय संप मागे घेणार नाही अशी भूमिका मांडली आहे. केएमटी प्रशासनाकडून अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांनी वेतन आयोग व कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत जूनमध्ये कार्यवाही करण्यात येईल. महागाई भत्त्याची 25 टक्के रक्कम जूनच्या पगारात जमा करण्यात येईल, अशी भूमिका मांडली होती. मात्र, सरनाईक यांनी तारखेची मागणी केली होती. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सरनाईक यांनी संपाची घोषणा केली.

🤙 8080365706