
मुंबई : मलेरियाचा उद्रेक समजण्यासाठी हवामान विभाग अॅप तयार करणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
ते म्हणाले की, हवामान हा घटक सर्वच क्षेत्रांवर प्रभाव टाकत असल्याने अनेक विभागांना आमची मदत लागत आहे. त्यात सर्वाधिक मदत आरोग्य विभागाला होणार आहे. आपल्या हवामानात बदल झाला की देशाच्या विविध भागांत मलेरियाचा उद्रेक होतो. त्याचा अलर्ट सध्या आमच्या ‘मौसम डॉट जीओव्ही’ या संकेत स्थळावर मिळतो आहे. मात्र, त्याला अधिक वेगवान करण्यासाठी लवकरच मलेरिया अलर्ट अॅप तयार करण्यात येणार आहे.
