हसन मुश्रीफांच्या कार्यकर्त्याकडून भाविकांना मारहाण

कोल्हापूर : जोतिबा येथे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

दख्खनचा राजा जोतिबा याच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात.पुण्याहून काही भाविक आपल्या चार चाकी गाडीतून ज्योतिबाच्या दर्शनासाठी आले होते.यावेळी पार्किंग मध्ये गाडी पार्क करून ते दर्शनासाठी गेले होते.हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते ज्योतिबाला अभिषेक करण्यासाठी आले होते. ते आपली गाडी पुणे येथील भाविकांच्या गाडीच्या मागे लावून मंदिरात गेले.पुणे येथील भाविक दर्शन करून परत आले पण त्यांच्या गाडीच्या आडवी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची गाडी असल्याने त्यांना आपली गाडी काढता आली नाही.यानंतर जवळपास एक तासाहून अधिक काळ वाट बघण्यात गेली.त्यानंतर कार्यकर्ते आले.

यावेळी पुण्याच्या भाविकांनी गाडी अशी चुकीच्या पद्धतीने का लावली,इतरांना त्रास होतो असे म्हणताच राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा राग अनावर झाला.त्याने वयोवृद्ध सुशिक्षित भाविकांना मारहाण केल्याची घटना सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या घटनेमुळे भाविकांच्यात तीव्र संताप व्यक्त होत असून कोल्हापूरकरांना मान खाली घालायला लावणारा हा प्रकार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

🤙 8080365706