
मुंबई : राज्यात कोरोनाचा आलेख वाढता असून आज एकाच दिवसात राज्यात ६९४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 184 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.
राज्यात आजपर्यंत एकूण 79,92,229 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.14 टक्के एवढे झाले आह. आज राज्यात 694 नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण 3,016 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईत आढळते, त्यानंतर ठाणे आणि पुण्याचा क्रमांक लागतोय.
