निर्णया शिवाय माघार नाही, प्रकल्पग्रस्तांचा निर्णय

श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलनाचा ३२ वा दिवस

कोल्हापूर : ३२ व्या दिवसा अखेर मा. उपवनसंरक्षक तथा प्रकल्प अधिकारी कोल्हापूर यांना मोर्चाचे निवेदन दिले आहे तरी आज देशांमध्ये रामनवमी उत्सव साजरा होत आहे. तरी आम्हा प्रकल्पग्रस्तांना कलेक्टर कचेरीसमोर रामनवमी साजरी करावी लागली. म्हणून प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच आम्ही दिलेल्या निवेदनामध्ये वन विभागाच्या संबंधित असणारे मुद्दे त्या संदर्भात दोन्ही मुख्य वन संरक्षक (प्रा) कोल्हापूर दोन मा. वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर व प्रकल्प अधिकारी यांनी प्रत्यक्षात बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे काम चालू केल्याशिवाय आणि ४.५ कोटी रुपये मंजूर केलेली रक्कम त्याचे वाटप बाकी आहे ते प्रत्यक्षात वाटप केल्याशिवाय आम्ही तिथून माघार घेणार नाही.

तसेच रामनवमीनिमित्त हॉटेल ज्यूस मिल शिव भोजन केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यांनी १०० प्रकल्पग्रस्तांना मोफत जेवण दिले.

आज आंदोलनात उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष मारुती पाटील यांनी केले व पांडुरंग कोठारी, विनोद बडदे यांची सुद्धा भाषणे झाली. यावेळी कार्यकर्ते रमेश चव्हाण, शामराव उंडे, धोंडीबा पवार, शामराव कोठारी उपस्थित होते.

🤙 8080365706