
छत्रपती संभाजीनगर: येथे काल रात्री मोठा राडा झाला होता. संभाजीनगरमध्ये दोन गटाच्यां राड्यात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तसेच दगडफेक देखील करण्यात आली. संतप्त जमावाने पोलिसांचे वाहनही जाळले.दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिनसी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी १५ गाड्यांचे नुकासन केले आहे. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, दंगा भडकवणे आदी कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
