
पुणे : बी. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीने ससून रुग्णालयातील इमारतवरून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
युवतीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.आदिती दलभंजन (वय २०, रा. सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. आदिती बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होती. आदितीची परीक्षा होती. आदितीला महाविद्यालयात सोडण्यासाठी पालक आले होते. तिला महाविद्यालयात सोडून ते कामाला गेले.सकाळी साडेदहाच्या सुमारास आदिती ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीच्या गच्चीवर गेली आणि तिने गच्चीवरुन उडी मारली.
आदिती आवारात कोसळली.गंभीर जखमी झालेल्या आदितीचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आवारात धाव घेतली. आदितीच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
