राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार; जयंत पाटील

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केले आहे.

पाटील म्हणाले, ‘सुप्रमी कोर्टाच्या निकालामध्ये शिंदे गटातील आमदार जर अपात्र झाले तर शिदें-फडणवीस सरकारला सत्तेत राहता येणार नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार आहे.’सुप्रीम कोर्टाच्या निकालात जर डिसकॉलिफिकेशन झालं तरी या सरकारला राहता येणार नाही. सरकारच जर राहिलं नाही तर दुसरा कोणता पर्याय राहील असं मला वाटत नाही. त्या अनुषंगाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं मी बोललो होतो, असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी यावर दिलं आहे. राष्ट्रपती राजवटीच्या त्यांच्या वक्तव्याने राजकारणात शिंदे-फडणवीस सरकारविषयी चर्चांना उधाण आलं आहे.

🤙 8080365706