
कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे.या निवडणुकीत महाडिक गट विरुद्ध सतेज पाटील गट अशी लढत होत आहे.निवडणुकीसाठी काल सोमवार पर्यंत विविध गटातून एकूण २३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.आज या दाखल अर्जांची छाननी प्रकिया पार पडली असून ३३ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
आज दिवसभर छाननी प्रकिया भूविकास बँक येथे सुरू होती.छाननीसाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.विविध गटातून दाखल झालेल्या 33 हरकतींवर उद्या सकाळी 11 वाजता अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
उद्यापासूनच उमेदवारी अर्ज माघारीला सुरुवात होणार आहे.जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर वरिष्ठ सहायक निबंधक प्रदीप मालगावे व अमित गराडे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात आहेत.
