आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस शुभ राहिल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल.

वृषभ मानसिक अशांती असल्याने संकटाचा सामना करावा लागेल. नोकरीत जबाबदारी नुसार कामे करा. कलह वाढविणारे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक पिडादायक दिनमान आहे. व्यवसायिक मंडळीने जपून आर्थिक करावे.

मिथुन विद्ववत्तेत वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. रोजगारात यश व लाभ मिळण्याची पुरेपुर शक्यता आहे. व्यवसायात विस्तारासंबंधी योजना आखाल. मनाजोग्या घटना घडतील. प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे आपल्या गोष्टी लोकपर्यंत पोहचवण्यात यशस्वी व्हाल.

कर्क नोकरीत फार धोका पत्करणे सध्या तरी योग्य नाही. निर्णच चुकीचा ठरू शकतो. कर्मप्रधान रहा. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेमध्ये लाभ होईल. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

सिंह वरिष्ठांकडून कमी प्रमाणात सहकार्य लाभेल. अनिश्चततेमुळे अडचणी वाढतील. व्यापारिक वाद मतभेद होण्याची शक्यता आहे. जबाबदारीची कामे संभाळून करावीत. नोकरीत नव्या कल्पना सुचत असल्या तरी त्या विशेष फायद्याच्या ठरणार नाहीत. उत्पन्नापेक्षा खर्च होईल असी स्थिती राहणार आहे.

कन्या कौटूबिक पातळीवर संतुष्ट राहाल. नवीन मित्रमैत्रिणी भेटतील. नातेवाईकांसोबत वदविवाद टाळावेत. अनावश्यक कामासाठी वेळ वाया घालू नका. नोकरीत आपल्या कार्याचा विस्तार वाढणार आहे. व्यापारात प्रतिस्पर्ध्यावर नजर ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्ध्यामुळे हानी होण्याची शक्यता आहे.

तूळ नम्रता ठेवल्यामुळे व्यवसायात हमखाश यश लाभेल. कौटुंबिक स्थितीत सुधारणा होणार आहे. काहींना धनलाभाच्या संधी मिळतील. नवीन व्यवसायास सुरुवात करू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहिल. अनुकुल घटना घडतील.

वृश्चिक रोजगारात महत्वाची भूमिका घ्याल. अनावश्यक चिंता करू नका. फायद्याच्या बातम्या ऐकायला मिळतील. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी लाभेल. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रतिकारक दिनमान आहे. घरातील समस्या दूर होतील.

धनु भांवडासोबत वादविवाद टाळा. नातेवाईक मित्रमैत्रिणी बाबत अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन संधी आल्या तर स्वीकार करा. तणावमुक्त होऊन कार्य करा. आर्थिक बाबतीत कोणावर विसंबून राहू नये.

मकर जीवनात नवीन संधी निर्माण होतील. व्यापारिक स्पर्धेत यश मिळेल. व्यवसायात किंवा रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. लोकप्रियता वाढणार आहे. शासनाकडून पैसा किंवा सन्मान मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभणार आहे.

 कुंभ साडेसतीचा द्वितीय फेरा सुरु असला तरी तणावरहित चिंतामुक्त नवीन कार्यास आंरभ करा. यश निश्चितच लाभेल. आपला वाणीचा बुद्धीचा प्रभाव इतरावर राहिल. व्यापारात प्रतिष्ठा वाढेल. उधारी वसुल होतील. नोकरदारांच्या मनाप्रमाणे घटना घडतील.

मीन नोकरीत प्रगतीकारक दिवस असुन नवीन चांगली संधी अथवा पदोन्नती होईल.आपण पूर्वी घेतलेल्या कष्टाचे फळ आपणास मिळेल. नविन मित्र भेटतील. दुसऱ्यावर सहज आपली छाप पडूल शकेल. ग्रहयोग अनुकूल आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना आनंदाचा दिवस आहे.