शियेत बिबट्या सदृश प्राण्यांचे दर्शन : महिन्यात दुसऱ्यांदा दर्शन : बिबट्याच असल्याची शक्यता

शिये: (ता. करवीर ) येथील शिये – भुये मार्गावरील आडवा ओढा परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन झाले. पुलाची शिरोली येथील संदिप आसुर्लेकर – पाटील व त्यांच्या चुलत्यांनी आज रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या सदृश प्राणी रस्ता ओलांडून दक्षिण बाजूला जाताना पाहिला. संदीप व त्यांचे चूलते हे दोघे मोटारसायकलवरून जठारवाडी येथे पाहुण्यांकडे जेवायला निघाले होते.

शिये – भुये रस्त्यावर आडव्या ओढ्याच्या पुर्वेला लक्ष्मी ओढा आहे. ओढ्याच्या पुर्वेला एक महिन्यापूर्वी पहाटे जोतिबाला जाताना शियेतील व्यंकट पाटील व विलास पाटील दोघांनी बिबट्या सदृश प्राणी दक्षिण बाजूकडुन उत्तर दिशेने रस्ता ओलांडून जाताना पाहिले होते. त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही घटना सांगितली होती. दुसऱ्या दिवशी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात पहाणी केली. रस्त्याच्या दक्षिण बाजूच्या ऊसाच्या शेतात प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. मात्र ते ठसे बिबट्या सदृश प्राण्यांचे नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितले होते. या घटनेला एक महिना पूर्ण होण्याआधीच आज पुन्हा दोघांना बिबट्या सदृश प्राण्यांचे दर्शन झाले. त्यामुळे या परिसरात बिबट्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन सरपंच सौ. शितल मगदूम यांनी केले आहे.

……… प्रतिक्रिया ……….

सदर प्राण्यांच्या शरिरावर काळे ठिपके आहेत.अंदाजे पाच फुट लांबीला आहे.तो पुर्ण वाढ झालेला बिबट्या आहे.असे संदीप आसुर्लेकर पाटील यांनी सांगितले.

महिन्यांपूर्वी बिबट्या सदृश प्राणी दिसला होता अशी माहिती मिळाली होती. त्यावेळी प्रत्येक जागेवर पाहणी केली असता ठसे व्यवस्थीत दिसले नाहीत. पण दुसऱ्यांदा असा प्राणी याच परिसरात दिसला आहे. त्यामुळे बिबट्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर माहिती वरिष्ठांना कळवली आहे. उद्या या परिसरात पाहणी करणार असल्याचे वनरक्षक कृष्णात दळवी यांनी सांगितले.

🤙 8080365706