
सकाळ ही लहान मुलांसाठी अतिशय महत्त्वाची वेळ असतेपण पालक म्हणून आपण मात्र सकाळी खूप घाईत असतो. दिवसभराचे नियोजना सोबत अनेक गोष्टी करायच्या असल्याने आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. पण मुलांचा चांगला विकास व्हावा यासाठी सकाळच्या घाईतही मुलांसोबत आवर्जून करायला हव्यात अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया.
सकाळी उठल्या उठल्या मुलांना जवळ घेणे, त्यांची पापी घेणे आणि तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे सांगणे अतिशय गरजेचे असते. यामुळे मुलांना सुरक्षित वाटेल आणि दिवसभर विविध गोष्टी शिकण्यासाठी त्यांना याची चांगली मदत होईल.आपली मुलं किती चांगली आहेत, हुशार आहेत अशाप्रकारची सकारात्मक वाक्य सकाळी सकाळी त्यांच्याशी आवर्जून बोलायला हवीत. पूर्ण दिवसभरात त्यांचे कौतुक होईल की नाही माहित नाही. पण तुम्ही सकाळी त्यांचे कौतुक केलेत तर त्यांचा आत्मविश्वास आणि एनर्जी वाढण्यासाठी याची चांगली मदत होईल.मुलं दररोज नेमके काय करणार आहेत याबाबत त्यांना सकाळीच पुरेशी कल्पना द्या. दिवसभराचे नियोजन आधीच माहिती असल्याने प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या मनाची पुरेशी तयारी झालेली असेल.आपल्याला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण देवाचे किंवा आणखी कोणाचे कृतज्ञ आहोत हे मुलांपर्यंत पोहोचू द्या. इतकेच नाही तर मुलांनाही त्यांना आयुष्यात जे मिळत आहे त्यासाठी कृतज्ञ राहायला सांगा. याचा त्यांच्या मनावर दिर्घकालिन चांगला परीणाम होईल
