
कर्वेनगर : कांजूरमार्ग पूर्व येथे कर्वे नगर परिसरात असलेल्या एमएमआरडीएच्या १५ मजली इमारतीला इलेक्ट्रिक सिटीत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर तासा भरात आगीवर नियंत्रण निळवण्यात यश आले आहे. आग लागल्यामुळे धुराचे लोट परिसरात पसरले होते. इमारतीमधील 4 महिलांना या धुराचा खूप त्रास झाला.धूर झाल्याने त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
