डख यांची माहिती शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा शेती कामाचा वेग वाढला आहे. शेतकरी बांधव रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांची सध्या स्थितीला काढणी करत आहेत. अशातच मात्र आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीर परिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे.

या अंदाजात डख यांनी पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपली शेतीची कामे करणे आवश्यक राहणार आहे. डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज पासून 27 मार्च पर्यंत राज्यात पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे. 25 मार्च, 26 मार्च आणि 27 मार्च रोजी पडणारा हा पाऊस फक्त पूर्व विदर्भातच राहणार आहे. अक्कलकोट, देगलूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नागपूर या भागात या कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित राज्यात ढगाळ हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज डख यांनी बांधला आहे. तसेच राज्यात 28, 29 आणि 30 मार्च रोजी हवामान कोरडे राहणार आहे. यानंतर पुन्हा एकदा 31 मार्च आणि एक एप्रिल 2023 रोजी पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे.

🤙 8080365706