जोतिबा यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी

कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे.५ एप्रिल पासून जोतिबा चैत्र यात्रा सुरू होत आहे.

यानिमित्ताने पोलिस प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. तसेच जोतिबा पायथ्याच्या पार्किंग पासून दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना जुने आंब्याचे झाड आणि गिरोली घाटाकडून मोफत बस सेवा दिली जाणार आहे . नागरिकांना मोफत बस सेवा देण्यासाठी एस.टी प्रशासनाकडून 40 एसटी बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच 22 ठिकाणी सुसज्ज दुचाकी आणि चार चाकी पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे . भाविकांच्या सुरक्षिततेसाठी येथे 145 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

🤙 8080365706