
पुणे : शिक्षण हक्क कायदा म्हणजे आरटीई अंतर्गत अर्ज करण्याची आज शेवटची मुदत आहे.
या कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी 17 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती, पण ही मुदत वाढवून 25 मार्च करण्यात आली. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेत 8,828 शाळांमध्ये तब्बल 1 लाख 1 हजार 969 जागा उपलब्ध आहेत.
