
नवी दिल्ली : औरंगाबाद शहाराच्या संभाजीनगर नामांतराला विरोध करणाऱ्यांना अखेर सुप्रीम कोर्टाकडूनही फटकारलं आहे. नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगर नामांतरावाचा ठराव मंजूर केल्यानंतर नुकतीच केंद्र सरकारनेही या प्रक्रियेला मंजुरी दिली. त्यानंतर नामांतरविरोधी संघटनांनी याविरोधात कायदेशीर लढा देण्याचा निश्चय केला होता. नामांतराला आक्षेप घेणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. आज अखेर ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे नामांतरविरोधी संघटनांसाठी ही मोठी चपराक समजली जात आहे. यामुळे नामांतरविरोधी संघटना, विशेषतः एमआयएम पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.
