राहुल गांधीच्या शिक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक ; भाजप विरोधी निदर्शने

कोल्हापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.त्यांना झालेल्या शिक्षेविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजप सरकारच्या विरोधी निदर्शने करण्यात येत आहेत.आज कोल्हापुरातही याचे पडसाद उमटले होते.कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सायंकाळी 7 च्या सुमारास काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.राहुल गांधी यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.हे चुकीचे असून भाजप सरकार सरकारी यंत्रणांना हाताशी धरून मनमानी कारभार करीत असल्याने याला विरोध म्हणून ही निदर्शने करण्यात येत असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी म्हटले आहे.यावेळी सचिन चव्हाण यांच्यासह कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष उदय पोवार व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706