आडूर येथे शेतात आढळला मृतदेह

बहिरेश्वर :आडूर ( ता. करवीर ) येथे कोल्हापूर गगनबावडा रस्त्याला लागून असलेल्या शेतात तरुणाचा मृतदेह आढळला. संतोष ज्ञानदेव पोतदार (वय ४०, रा. पणुत्रे ता. पन्हाळा) असे या मृत तरुणाचे नांव आहे. पोलिस पाटील सरीता पोवार यांनी करवीर पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संतोष पोतदार यांच्या आई वडीलांचे निधन झाले आहे. त्याला चार बहिणी आहेत. त्यातील तिघी विवाहित आहेत. एक अविवाहित असून कोल्हापूर येथे नोकरी करतात. संतोष व्यसनी होता. त्यामुळे तो घरी न थांबता फिरत असे. आज सकाळी कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील कोपार्डे व आडूर दरम्यानच्या फरशीच्या ओढ्याजवळ संतोष मृतावस्थेत आढळला. याची माहिती आडूरच्या पोलिस पाटील सरीता पोवार व कोपार्डेचे पोलीस पाटील जालिंदर जामदार यांना मिळाली. सरीता पोवार यांनी करवीर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. करवीर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला.

🤙 8080365706