आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आर्थिक फसवणूकीची शेतकऱ्यांची तक्रार एसपी कार्यालयात दाखल

कोल्हापूर येथे आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे आ.हसन मुश्रीफ यांच्या विरोधात फसवणूकीचा तक्रार अर्ज देताना शेतकरी प्रकाश डावरे.

कोल्हापूर : सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासद व शेअर्स प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केली आहे.अशी तक्रार आणखी 25 शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे डीवायएसपी श्रीकांत पिंगळे यांच्याकडे दाखल केली आहे. याआधी मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात याच प्रकारची तक्रार कागलचे विवेक कुलकर्णी व इतर शेतकऱ्यांनी दाखल केलेली आहे.

निवेदनातील मजकूर असा.

आमदार हसन मुश्रीफ यांनी उभारलेल्या सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि. बेलेवाडी (का) या कारखान्याचे सभासद कोण्याकरिता म्हणून आम्ही प्रत्येकी दहा हजार रुपये दिले आहेत. आम्हास नुकतेच समजून आले आहे की सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आमदार हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबातील लोकांचा व काही एलएलपी कंपनीच्या मालकीचा आहे. यामध्ये अन्य कोणीही सभासद केलेले नाहीत .शेतकऱ्यांच्या कडून केवळ पैसे जमा केलेले आहेत. याबाबतचा गुन्हा मुरगुड पोलिसांमध्ये त्यांच्याविरोधात दाखल झाला आहे.

त्यामध्ये आमचे देखील आमदार मुश्रीफ यांनी सदर कारखान्यांमध्ये सभासद करून घेतो असे सांगून दहा हजार रुपये घेतले असून शेअर्स दिलेले नाहीत व सभासदही केलेले नाही. यामध्ये त्यांनी आमची फसवणूक केली आहे. आमच्याकडून त्यांनी पैसे घेतले बाबत त्यांच्या विरोधात आमची तक्रार आहे.तरी आमच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्हांलादेखील सदर गुन्हा रजिस्टर नंबर 30/2023 मध्ये सामील करून घ्यावे व आमचा विस्तृत जबाब पोलिसांनी नोंदवून घ्यावा. असे निवेदन शिवाजी जाधव कागल व प्रकाश डावरे गलगले यांनी पंचवीस शेतकऱ्याच्या वतीने आज एस पी ऑफिस मध्ये दिले आहे.

🤙 8080365706