कागलमधील शेतकऱ्यांची थेट इडी कार्यालयात धडक

कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याबद्दल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या स्पष्टीकरणासाठी कार्यक्षेत्रातील एक हजारहून अधिक शेतकऱ्यांनी थेट मुंबईच्या ईडी कार्यालयात धडक दिली आहे.

संजय चितारी यांनी कागलचे विवेक कुलकर्णी आणि 16 जणांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने वस्तुस्थितीचा खुलासा करण्यासाठी शेतकरी मुंबईच्या ईडी कार्यालयात पोहोचले आहेत.

मुंबईत ईडी कार्यालयात गेलेल्या गोकुळचे संचालक व ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, नवल बोते, विकास पाटील, प्रवीणसिंह भोसले, नितीन दिंडे आदी प्रमुखांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली होती.यानंतर पोलिसांनी पकडून नेलेल्या प्रमुख नेतेमंडळी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांना आझाद मैदानावर नेऊन सोडून देण्यात आले. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना शीतपेये आणि पाणी देऊन त्यांचे योग्य प्रकारे आदरातिथ्य केले.

🤙 8080365706