
मुंबई : गु़ढीपाडवा मेळाव्यातही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय पुन्हा एकदा व्यासपीठावरून मांडला. तर यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारनं यात लक्ष घालावं अशी विनंती त्यांनी केली.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगायचं आहे की, तुमच्याकडे धनुष्यबाण चिन्ह आलं आहे. तुमच्याकडे शिवसेना हे नाव आलं आहे. तुम्ही सांगता तुमच्या नसानसात बाळासाहेबांचे विचार आहेत. मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे, गेल्या गुढीपाडव्याला आम्ही जे सांगितलं होतं की मशिदीवरील भोंगे बंद करा. गेल्या सरकारमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर 17 हजार गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे पहिल्यांदा मागे घ्या.”, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.“दुसरं, एकतर तुम्ही सांगा लाउडस्पीकर बंद करा, अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा. आम्ही लाउडस्पीकर बंद करतो. दोन पैकी एक निर्णय एकनाथ शिंदे सरकारला घ्यावाच लागेल. गेल्या काही दिवसात मशिदीवरील भोंगे पुन्हा मोठ्या वाजू लागले आहेत. मी विषय सोडलेला नाही. मी विषय सोडणार नाही. मी पुन्हा यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार. मी मुद्दामून तुमच्या साक्षीने हा मुद्दा येथे काढला.त्यासाठी मी परत जाऊन भेटणार.”, असं आवाहन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं.
