अतिपिकलेल्या केळांचा असा करा वापर…

अतिपिकलेली केळी खाल्ली जात नाहीत. त्यावर काळपट डाग पडू लागतात. त्यामुळे अनेकजण  पिकलेली केळी फेकून देतात.अती पिकलेली केळी फेकून न देता. आपण ‘या’ गोष्टींसाठी ही केळी वापरु शकतो

अतिपिकलेल्या केळ्यांचा वापर करून आपण कोलेजन बूस्टर फेसपॅक बनवू शकता. यासाठी पिकलेले केळं मॅश करा, त्यात मध मिक्स करून चेहऱ्याला लावा. आता हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील पोटॅशियम, रक्त परिसंचरण सुधारते, यासह कोलेजन वाढण्यास मदत होते.

केळी जास्त पिकल्यावर त्याची पेस्ट बनवून शरीरावर लावू शकता. शरीरातील घाण साफ करण्यासोबतच त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते. यासाठी एक केळं घ्या, ते मॅश करा आणि त्यात बेसन घालून मिक्स करा. आंघोळ करण्यापूर्वी अंगावर लावा. काही वेळानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा.

हेअर मास्कसाठी २ पिकलेली केळी एकत्र मॅश करा, त्यात १ चमचा खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल आणि मध घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना आणि टाळूवर लावा. १० मिनिटानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा.

पिकलेल्या केळीचा वापर करून आपण शेक किंवा कस्टर्ड बनवू शकता. हे खाल्ल्याने पोट निरोगी राहण्यास आणि पचनक्रिया गतिमान होण्यास मदत होईल.

🤙 8080365706