औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतरास आव्हान देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते मुश्ताक अहमद यांच्यासह अण्णा खंदारे, हिशाम उस्मानी, अॅड. सईद शेख आणि राजेश मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात या नामांतरास आव्हान दिले असून, या प्रकरणी आठ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 24 मार्च रोजी आणि मुंबई उच्च न्यायालयात 27 मार्चला सुनावणी होणार आहे.

नामांतराविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्यासमोर 27 मार्च रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे त्यापूर्वी 24 मार्चला दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. यावेळी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत याचिकाकर्ते यांनी नामांतराच्या निर्णयाला विरोध करत अनेक मुद्दे याचिकेत मांडले आहेत. अल्पमत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय घेतलाम जो पुढे शिंदे सरकारने रद्द केला. त्यानंतर दोन मंत्री असलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने छत्रपती संभाजीनगर केले.

🤙 8080365706