पाडवा मेळाव्या आधीच मनसेची बॅनरबाजी

मुंबई: शिवाजी पार्क येथे आज होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच्या पाडवा मेळाव्यापूर्वी मनसेकडून शिवसेना भवनासमोर जोरदार बॅनरबाजी करण्यात आलीय. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतायत. या बॅनरवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा अशय असलेला मजकूर छापण्यात आलाय.

दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्याचे निमित्त साधत मनसेने शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे बॅनर लावले आहेत. मात्र, हे बॅनर स्वागताचे किंवा शुभेच्छा देण्याचे नाहीत. त्यामुळे या पोस्टरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मनसेकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे’. या नव्या पोस्टरची आता चर्चा आहे. राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

🤙 8080365706