
बडीशेप जेवणानंतर खाल्ली जाते पण हेच जर जेवणाआधी घेतलं तर छान बेली फॅट कटर ड्रिंक होऊ शकतं. चला तर मग जणून घेऊयात बेली फॅट कटर ड्रिंकचे फायदे.
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाआधी एक घरगुती ड्रिंक घेतल्यानं वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. दिवसभरात एकच कप घेतलं तरी चालेल. एक कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळवा. जास्त न उकळून देता फक्त १ ते २ मिनिटं हे मिश्रण उकळू द्या. मग गाळून हे ड्रिंक प्या. याचे तीन फायदे होतात.
बेली फॅट कटर ड्रिंकचे फायदे१) शरीराला गारवा मिळतो कारण बडीशेप उष्णता कमी करते.२) भूक कमी लागते त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं३) पोटावरची चरबी होऊ लागते. कारण बडीशेपेचं पाणी चांगलं फॅट कटर ड्रिंक आहे.
