
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आपल्या प्रशासकीय कालावधीला आज एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत अनेक कामाला न्याय देण्यात आला असून विशेषता आरोग्य आणि शैक्षणिक विभागात चांगलं काम झालं आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपल्या प्रशासकीय कालावधीच्या वर्षपूर्ती निमित्त त्यांनी आज (मंगळवारी) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी चव्हाण यांना पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.
आपल्या एक वर्षाच्या कालावधीतील कामांबाबत माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले महा आवास अभियान 2020-21 मध्ये कोल्हापूर जिल्हयामध्ये 465 बहुमजली इमारत बांधण्यात आल्या आहेत. महा आवास अभियान उपक्रमांमध्ये बहुमजली इमारती बांधणे अंतर्गत प्रथम क्रमाकांचा पुरस्कार देवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला गौरविण्यात आले आहे.
पुणे विभागात उल्लेखनीय काम केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून प्रथम क्रमांकाचे नामांकन प्राप्त झाले तसेच पुणे विभागात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये जिल्हयातील पाच पंचायत समिती अव्वल आहेत. शासनामार्फत जाणारा पंडित दिनदयाळ उपाध्याय पुरस्कार 2022 कोल्हापूर जिल्हा परिषदेने सर्वसाधारण गटात राबविलेले उपक्रम विविध निकषामध्ये केलेल्या कामकाजामुळे राज्यामध्ये सर्वोत्कृष्ठ जिल्हा परिषदेचे पारितोषीक (प्रमाणपत्र रु.50 लाख) प्राप्त झाले . आजरा तालुक्याकडील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीस सर्वसाधारण गटामध्ये सर्वोत्कृष्ठ आली असून रु.8 आणि प्रमाणपत्र लाख बाल स्नेही पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ठ (प्रमाणपत्र व रु. 5 लाख ) असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.कोल्हापुर जिल्ह्याचे (क्षयरोग विभाग) गोल्ड नॅशनल सर्टीफीकेशन -२०२२ सबनॅशनल सर्टीफीकेशन पुरस्कारासाठी निवडण्यात करण्यात आली .यशवंत राज अभियान 2022-23 मध्ये जिल्हा परिषद कोल्हापूर पुणे विभागामध्ये पडताळणी नंतर अव्वल आली असून लवकरच राज्यस्तरीय समितीकडून याची पडताळणी होणार आहे होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय संपादणुक सर्व्हेक्षण 2022-23 मध्ये कोल्हापूर जिल्हयास राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे . ASER च्या अहवालामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक वर आहे.
शिक्षण विभागातील कामाच्या योगदानाबाबत चव्हाण म्हणाले प्राथमिक शिक्षण विभागातंर्गत सन 2021-2022 वर्षामध्ये आलेल्या उच्च माध्यमिक (इ.5 वी) पूर्व माध्यमिक वी) या शासकिय शिष्यवृत्ती परिक्षेत कोल्हापूर जिल्हा ने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. शिष्यवृत्ती परिक्षेत 5 वी ची उत्तीर्णची राज्याची टक्केवारी 23.90असुन जिल्हयाची टक्केवारी 41.63 आहे. तसेच 8 वी ची उत्तीर्णची राज्याची टक्केवारी 12.54 असुन जिल्हयाची टक्केवारी 28.63 इतकी आहे. राज्य गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागात 5 वी चे 34 तर आठवीचे 42 विद्यार्थी गुणवत्ताधारक झाले आहेत.
कोल्हापूर जिल्हयाने शैक्षणिक क्षेत्रात यशाची परंपरा अखंडीत ठेवली आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी नवनवीन कल्पना राबवून अत्याधुनिक साधने देण्यासाठी जिल्ह्यातील 11 शाळांसाठी 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आले आहेत . जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या 866 शाळांना वाचनीय अभ्यासू व मार्गदर्शनपर पुस्तके पुरवणीसाठी 2 कोटी 60 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या उपक्रम उपक्रमाला जिल्ह्यातील गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाल्याने नदी प्रदूषण कमी होण्यास मदत झाली आहे. आरोग्य विभागामार्फत ही चांगल्या सुविधा देण्याचं काम चांगलं झाल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले राष्ट्रीय बाल स्वास्थ् कार्यक्रमांतर्गत0 ते 18 वयोगटातील6 लाख 26 हजार 57 मुलांची 100 टक्के आरोग्य तपासणी केली आहे. आरोग्य मध्ये हृदय दोष आढळलेल्या मुलांची शस्त्रक्रिया 2021-22 मध्ये 197 व सन 2022-23 मध्ये 204 असे दोन वर्षामध्ये एकूण 401 मुलांची यशस्वीरित्या मोफत करणेत आली. यामध्ये 0 ते 2 वर्ष वयोगटातील (नवजात) 170 बालकांची शस्त्रक्रिया झाली. “माता सुरक्षित तर सुरक्षित” सप्टेंबर पासून असुन, 18 वर्षावरील महिलांची आरोग्य तपासणी करणेत कोल्हापूर जिल्हयातील ग्रामीण भागातील एकूण 1149092 महिलांपैकी 1117216 महिलांची आरोग्य तपासणी आजाराचे निदान झालेल्या महिलांना आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा उपचार करणेत आले आहेत. 0ते 18वर्षापर्यंतची बालके किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणी अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामधील शाळा अंगणवाडी केंद्रांतील बालकांची तपासणी असुन आतापर्यंत0ते 6 वयोगटातील 42117 व 6 ते18 वयोगटातील 202258 बालकांची तपासणी झाली. आजाराचे निदान झालेल्या 4442 बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करण्यात आले. जिल्हा परिषद स्वनिधीतून मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता राजर्षी शाहू महाराज कमवा आणि शिका’ योजना राबविण्यात येत आहे. त्यांना विद्यावेतन देण्यात येत आहे.
सदर योजनेंतर्गत IGNOU मार्फत या अभ्यासक्रमासाठी घेणाऱ्या रुपये व्दितीय वर्षासाठी 10,000/- इतके विद्यावेतन निश्चित असून, प्रतीमाह रुपये 4000/- इतका भत्ता देण्यात आहे. योजनेंतर्गत प्रथम वर्षासाठी 7 मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.महिला व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी ओला सुका मसाला करण्याचे मशीन करिता अनुदान येणार त्याकरिता रक्कम रुपये 38,33,947/- इतकी तरतूद करण्यात आली आहे.दिव्यांग शाळांना शैक्षणिक साहित्य पुरविणे योजनेतंर्गत दिव्यांगांच्या शाळांकरिता शिलाई यंत्र, खडू बनविणे मशीन ,ट्रेम्पोलिन, फाईल मेकिंग वॉशिंग मशिन, लॅमिनेशन स्पायरल बायडिंग मशिन पुरविणेत आली आहे.
दिव्यांगांच्या सहाय्यकारी साधनांची दुरुस्ती करणे यासाठी 50 टक्के अनुदान.25 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करून अंदाजीत 1320 चे साहित्य दुरुस्त करून देण्यात आले आहे.जि.प. स्वनिधी मधून सन मध्ये ग्रामीण भागातील कोविड-19 मुळे विधवा, दिव्यांग महिला देवदासी वीर जवान पत्नी अर्धांगिनी यांच्यासाठी 25 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रिय प्रोत्साहन सदर नाविन्यपुर्ण योजनेमधुन जिल्हयातील अल्प, अत्यल्प इतर भुधारक अनुदान लाभ देणेत येत आहे. जिल्हा प्रशासकीय बदल्या बाबत योग्य ती दखल घेऊन त्या त्या ठिकाणी रिक्त पदे पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी सांगितले .
