छ. संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त शहरातून मुक पदफेरी काढुन आदरांजली

कोल्हापूर: आज सायंकाळी हुतात्मा स्मारक मिरजकर तिकटी येथे मशाल प्रज्वलन करुन छ. संभाजी राजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मुक फेरीला सुरवात झाली.

मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तीकटी चौकातील छ.संभाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यांत आले .

पदफेरीत हजारोंच्या संख्येने युवक सहभागी झाले होते. मार्गात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यापाऱ्यांनी पद फेरीच्या मार्गांवर आपल्या व्यवहाराचे ठिकाणि लाईट मालवून छ. संभाजी महाराज यांना अभिवादन केले. हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने संभाजी साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली छ.शिवाजी महाराज चौकात अभिवादन करुन पदफेरीची सांगता झाली.

🤙 8080365706