….अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू

कोल्हापूर : जुनी पेन्शनमुळे महाराष्ट्रातील जनतेवर करवाढीचा बोजा वाढणार आहे. त्यात आधीच राज्यावर साडे सहा हजार कोटीचे कर्ज आहे. या जुनी पेन्शन योजनेमुळे जनतेची आर्थिक स्थिती कोलमडणार असल्याने जुनी व नवीन पेन्शन योजना राज्यसरकारने चालू करू नये,अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा उज्वल संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जुनी व नवीन पेन्शन योजना चालू करू नये या मागणीसाठी उज्वल संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की,गेल्या अनेक दिवसापासून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सर्व सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांनी संप पुकारला आहे. या पेन्शनमुळे महाराष्ट्रातील जनतेवर करवाढीचा बोजा वाढणार आहे. त्यात आधीच राज्यावर साडे सहा हजार कोटीचे कर्ज आहे. या जुनी पेन्शन योजनेमुळे जनतेची आर्थिक स्थिती कोलमडणार आहे. १५० वर्षापूर्वी ब्रिटीशांनी मुठभर लोकांना हाताशी धरून जनतेची लुट केली, ब्रिटीश गेले स्वातंत्र्य मिळाले आणि आता १८ लाख सरकारी कर्मचारी जनतेला लुटण्याचे काम करत आहेत. सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्याला नोकरी शाश्वती आहे. वेतन आयोग, निवृत्ती वेतन आहे व काही ठिकाणी इतर कमाईही आहे. आधीच देशावर व महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा असताना या जुनी पेन्शन लागू करून देशाचा, राज्याचा व शहरांचा विकास होणार नाही. ज्यांना जुनी पेन्शन हवी आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व त्या जागी नवीन नोकर भरती करून २ लाख ३३ हजार रिक्त पदावरती महाराष्ट्रातील सुशिक्षीत बेरोजगारांना शासनाने संधी द्यावी. गोरे जाऊन सरकारी भोळे लोक जनतेला लुटत असतील तर महाराष्ट्रातील जनता अजिबात खपवुन घेणार नाही. त्यामुळे राज्यसरकाराने जुनी व नवीन पेन्शन लागू करू नये. बेरोजगारी घालवा व भावी पिढी घडवा. सर्व पेन्शन बंद करून महाराष्ट्र वाचवा अन्यथा सर्व निवडणूकीत बहिष्कार टाकू याची नोंद राज्य शासनाने घ्यावी.यावेळी गणेश लाड, अजित पाटील, परवेज पठाण, विश्वजीत बगाडे, प्रसाद पवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706