प्रकल्पग्रस्त आंदोलनस्थळीच गुढी उभारणार

कोल्हापूर : शासकीय कर्मचारी वर्गाच्या संपाची कारण पुढे करून मदत व पुनर्वसनवचनाचे प्रधान सचिव यांनी नियोजित केलेली बैठक रद्द केली आहे. पुन्हा कधी बैठक होईल हे ठामपणे न सांगता फक्त बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले गेले आहे. दोन दिवसात गुढीपाडव्याचा सण असून यावर्षीचा गुढीपाडवा प्रकल्पग्रस्तांकडून आंदोलनस्थळीच गुढी उभारून साजरा करण्यात येणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

परिपत्रकात म्हटले आहे की, चांदोली अभयारण्यग्रस्तांचे आंदोलन सलग २२ दिवस सुरु असून यावर्षीचा गुढीपाडवा आंदोलनस्थळीच साजरा गुढ्या उभारुन करण्यात येणार आहे. आंदोलनाची पुढील दिशा शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या स्मृतिदिनी २३ मार्च रोजी ठरणार आहे.आंदोलनाच्या २२ व्या दिवसानंतर देखील प्रशासनाने किंवा सरकारने कोणतीही दखल आंदोलन कर्त्याची घेतली नाही शासकीय कर्मचारी वर्गाच्या संपाची कारण पुढे करून मदत व पुनर्वसनवचनाचे प्रधान सचिव यांनी नियोजित केलेली बैठक रद्द केली आहे.

पुन्हा कधी बैठक होईल हे ठामपणे न सांगता फक्त बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले गेले आहे. दोन दिवसात गुढीपाडव्याचा सण असून यावर्षीचा गुढीपाडवा आंदोलनस्थळीच गुढी उभारून साजरा करण्यात येणार आहे येत्या दोन दिवसात पत्र जर दिले गेले नाही तर २३ मार्च रोजी आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर केला जाईल.एका बाजूला शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बैठक होऊ शकते तर दुसरीकडे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची बैठक का होऊ शकत नाही?महिलांना न मागता ५०% एसटी मध्ये सवलत मिळू शकते पण हजारो महिला आंदोलनात आपल्या न्याय हक्कासाठी बसले आहे त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नसल्याचेही परिपत्रकात म्हटले आहे.आज आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी मारुती पाटील, डी के बोडके, नजीर चौगुले, मारुती धों.. पाटील, विनोद वडदे, दाऊद पटेल, पांडुरंग पोवार, पांडुरंग कोठारी, जगन्नाथ कुडतुडकर, भगवान काळे, रफिक पटेल कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706