कागल येथे चैत्र गुढीपाडवा ते राम नवमी या पर्वकाळात भव्य दिव्य परमार्थिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कागल: कागल येथे चैत्र गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या पर्वकाळात भव्य आणि दिव्य परमार्थिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती रामनवमी उत्सव समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिली आहे.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वांड:मय लेखक प्रा.के.वी. बेलसरे यांच्या दिव्य ग्रंथावर आधारित प्रवचन मालिकेचे आयोजन ही करण्यात आलेले आहे .कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे… बुधवार दि. 22 मार्च 2023 रोजी श्रींचा पुनर्जन्म व बाललिला. गुरुवार दिनांक 23- बाल वयातच गुरु व भगवंत दर्शनाची तळमळ शुक्रवार दिनांक 24 – ग्रहत्याग व संपूर्ण भारतभ्रमण व ग्रुप कृपा शनिवार दिनांक 25 – श्री गुरु अनुग्रह गुरुसेवा रविवार 26 गोंदवले श्री चे आगमन व कार्य सोमवार 27 -भारतभर अनेक मंदिरांची स्थापना मंगळवार 28- श्रींनी अनेक शिष्य निर्माण केले व गोंदवलेत संजीवन समाधी घेतली.

वरील कार्यक्रम सायंकाळी पाच ते सात या वेळेत श्रीराम मंदिर कागल येथे होणार आहेत. तसेच बुधवार दिनांक 29 रोजी अखंड श्रीराम जप(13तास) व प्रवचन मालिका समाप्ती. सकाळी सहा ते सायंकाळी सात, गुरुवार दिनांक 30 रोजी श्रीराम सेवा भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल सकाळी 9.30 ते 11.30 तीस व दुपारी 12 वाजता प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा आरती व सुंठवडा.सायंकाळी 6 ते 7 श्रीराम भजन आधारित भरत नाट्यम कार्यक्रम आशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री राम नवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

🤙 8080365706