राजाराम कारखान्याची रणधुमाळी आजपासून सुरू ; आजी – माजी आमदार आमने – सामने

कोल्हापूर : गेल्या अनेक आरोप प्रत्यारोपांचा ठरलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीला आजपासून (20 मार्च) सुरु होत आहे. 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी 25 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या आणखी रंगणार आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी कट्टर राजकीय वैर असलेल्या सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक या आजी- माजी आमदारांच्या गटामध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे राजाराम कारखान्यात सत्तांतर होणार की, महाडिक पुन्हा एकदा सत्ता काबीज करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सर्वसाधारण गटातील 15, महिला प्रतिनिधी गटातील 2 तर संस्था प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि भटक्या विमुक्त गटातील प्रत्येकी एक अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. संस्था गटाचे 129 तर 13409 अ वर्ग सभासद असे 13538 सभासद मतदानासाठी पात्र आहेत. सभासदांच्या अपात्रतेच्या मुद्यावरून दोन्ही गट आमनेसामने आले होते. त्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने सत्ताधारी महाडिक गटाला दिलासा दिला. दरम्यान, निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार, 12 एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. आजपासूनच ( 20 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. • दोन वर्षांपासून सतत निवडणूक लांबणीवर राजारामच्या विद्यमान संचालकांची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून निवडणूक पुढे ढकलली होती. त्यानंतर कारखाना सभासदांवरून झालेला न्यायालयीन लढा झाला. यामध्येही काही कालावधी निघून गेला. सभासदांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर 9 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली. त्यानंतर दोन दिवसांमध्ये राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

🤙 8080365706