
रक्तदाब ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. पूर्वी वयाच्या चाळीशीनंतर होणारा रक्तदाब आता वयाच्या तिशीतच व्हायला लागला आहे. त्यामुळे पाहूयात आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
टोमॅटो टोमॅटोमध्ये लाइकोपीन हा घटक असतो. यामुळे रक्त वाहण्याची किंवा पातळ होण्याची क्रिया नियंत्रणात आणण्यास मदत होते. हृदयरोग किंवा त्यामुळे उद्भवणाऱ्या इतर समस्या नियंत्रणात आणण्यासाठी हा घटक फायदेशीर असतो. टोमॅटो सहज उपलब्ध होणारा घटक असून सॅलेड म्हणून किंवा इतर पद्धतीने टोमॅटोचा आहारात समावेश करायला हवा. २. डाळी डाळींमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते म्हणून डाळींचा आहारात जास्तीत जास्त समावेश करायला हवा असे आपण नेहमी ऐकतो. पण प्रोटीनबरोबरच डाळींमध्ये ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणारेही घटक असतात. गाजर गाजर हा सॅलेडमधील एक उत्तम प्रकार आहे. त्यामध्ये फेनोलिक अॅसिड हा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. चिया सिडस आणि जवसतुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुमच्या स्वयंपाकघरात चिया सिडस आणि जवस या गोष्टी अवश्य असायला हव्यात. या दोन्ही घटकांतून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर मिळते. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी या दोन्ही गोष्टी अतिशय उपयुक्त असतात.
