ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने  आज (शनिवारी)१८मार्च सकाळी सहा वाजता निधन झाले.

ते मृत्यूसमयी ८८ वर्षाचे होते. पाच दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीमध्ये अधिराज्य गाजविले. कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतला हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. शनिवारी दुपारी बारा वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  भालचंद्र कुलकर्णी यांची चरित्र अभिनेते म्हणून ओळख होती. त्यांनी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. मराठीतील ख्यातनाम दिग्दर्शक व्ही. शांताराम,  भालजी पेंढारकर, अनंत माने, कमलाकर तोरणे, विजय कोंडके यांच्यापासून ते महेश कोठारे यांच्यासारख्या निर्माता- दिग्दर्शकासोबत काम केले. १९६५ मध्ये शेरास सव्वाशेर या सिनेमातून त्यांच्या चित्रपटातील कारकीर्दला सुरुवात झाली. “पिंजरा, असला नवरा नको ग बाई, मुंबईचा फौजदार, सोंगाड्या, एक गाव बारा भानगडी, सुगंधी कट्टा , करावे तसे भरावे, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, थरथराट, खतरनाक, धुमधडाका यासह ३०० हून अधिक सिनेमात  भूूमिका केलेले आहेत.

माहेरची साडी या चित्रपटातील त्यांची भूमिका स्मरणीय ठरली.  भालचंद्र कुलकर्णी हे शिक्षक होते. प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या शाळेत त्यांनी जवळपास ३५ वर्षे  नोकरी केली. शिक्षक ते चरित्र अभिनेता यावर आधारित “मी एक शिक्षक -एक विदूषक” हा नाट्यप्रयोग केले. भालचंद्र कुलकर्णी यांना नाटकाची आवड होती. त्यांनी स्वतःची मधु थिएटर्स या नावाने नाट्य संस्था होती. जवळपास पंधरा वर्षे त्यांना संस्थेचे काम सुरू होते. त्यांनी लोकनाट्य कामे केली. त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांना चित्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. चंद्र कुलकर्णी यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संचालक म्हणून काम केले. झोप आता जबाबदारी पार पडली होती. जयप्रभा स्टुडिओ व शालिनी सिनेटोन वाचवण्यासाठी कोल्हापुरात झालेल्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

🤙 8080365706