संपकरी कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून नोटीस

मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील वेगवेगळ्या विभागाचे शासकीय कर्मचारी संपावर गेले असून, संपाचा आज चौथा दिवस आहे.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्याचे जाहीर केले असून, संप मागे घेण्याचं आवाहन केले होते. मात्र असे असताना कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता संपकरी कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवायला सुरुवात केली आहे.

दरम्यान मराठवाडा विभागातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे.संपावर गेलेल्या मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख कर्मचाऱ्यांना शासनाच्या परिपत्रकानुसार शिस्तभंग आणि गैरवर्तणुकीची नोटीस देण्यात आले आहे. त्यामुळे आता संपाबाबत प्रशासन ‘अॅक्शन मोड’मध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ‘काम नाहीतर वेतनही नाही, या धोरणाचा अवलंब शासनाने केल्याचेही नोटीसमधून सांगण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या 78 विभागांतील 23 हजार 622 पैकी 8 हजार 722 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तसेच 14 हजार 596 कर्मचारी कामावर हजर आहे. तर मराठवाडा विभागातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूरमधील महापालिका वगळून सुमारे 80 हजार शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे विभागात वेगवेगळ्या विभागातील 54 हजार 171 कर्मचारी संपावर असून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकूण सव्वालाख कर्मचारी संपावर गेले आहेत.

🤙 8080365706