
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?
मेष राजकीय क्षेत्रात यश येईल. पदप्राप्ती सन्मान वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यसनापासून दूर रहा. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल.
वृषभ व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनइच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्याचे कौतुक हाईल. स्वभावातील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे. मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे.
मिथुन नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. नावलौकिक प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लागणार नाही. बडेजावपणा मिरवू नका. व्यापारात व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा.
कर्क पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. लाभदायक दिवस आहे. दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. लेखक साहित्य संपादन या क्षेत्रातील व्यक्तींना मानधनात वाढ होऊन आर्थिक लाभ होतील. विद्यार्थी वर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. व्यापारात जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील.
सिंह कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. प्रयत्नाच्या तुलनेत यश आधिक मिळेल. व्यापारीवर्गास मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे.
कन्या राजकीय कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामा प्रती सजग रहा. तुलामनाची उद्विग्नता वाढेल. आपण केलेल्या कार्याचा परतावा मिळणे कठीण जाईल. नोकरीत वरिष्ठांच्या विचारा विरुद्ध जाऊ नका. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. नुकसानकारक योग आहेत. राग आणि उत्तेजित पणा वाढेल.
वृश्चिक धार्मिक प्रवृत्तीत वाढ होईल. मानअपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत अनुकुलता राहिल. शासकीय कामकाजा करिता सफलतादायक दिवस आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेमप्रकरणात कुटुंबातील विरोधाला सामोरे जावे लागेल.
धनु वारसा हक्क पेन्शन विमा या कामात यश येईल. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात वातावरण असंतोषजनक राहील. गुप्तशत्रुकडून कारवाया घडतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल.
मकर रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार कारखानदार वर्गाची व्यवसायात वाढ होईल. कला तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल.
कुंभ व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अचानक धनलाभ होईल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारीवर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होतील. सकारात्मक परिणाम जाणवतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील.
मीन नोकरी रोजगारातील बदल प्रतिकुल ठरतील. धार्मिक शिक्षण क्षेत्रात कर्तुत्वाची संधी मिळेल. आरोग्य प्रकृती स्थिर व उत्साहपूर्ण राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबासोबत तीर्थस्थळावर प्रवास घडेल. भाऊ बहिणीकडून शुभसंदेश ऐकायला मिळतील.
