
ठाणे : आज किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे.

दरम्यान, या बैठकीसाठी किसान सभेच्या शिष्टमंडळात 12 जणांचा समावेश करण्यात आला आहे. पाहुयात या शिष्टमंडळात कोणाचा समावेश आहे.किसान सभेच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. यामध्ये 12 जणांचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नाशिकपासून लाँग मार्च काढला आहे.
किसान सभेचं शिष्टमंडळ1) जे पी गावित (माजी आमदार)2) इरफान शेख3) इंद्रजित गावित4) डॉ डी एल कराड5) अजित नवले6) उदय नारकर7) उमेश देशमुख8) मोहन जाधव9) अर्जुन आडे10) किरण गहला11) रमेश चौधरी12) मंजुळा बंगाळवरील 12 नेत्यांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी आज मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. दुपारी तीन वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीत तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरुच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
