खुपिरे सरपंच दीपाली जांभळे यांची पुरस्कारासाठी निवड

कुडित्रे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्रामसंवाद सरपंच संघटनेने खुपीरे ग्रामपंचायत सरपंच दीपाली जांभळे यांची गावविकासातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘आदर्श महिला लोकप्रतिनिधी सन्मान’ २०२३ या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आदिनाथ धामणे पाटील, उपाध्यक्ष प्रमोद भगत, प्रदेश सचिव विशाल लांडगे पाटील यांनी म्हटले आहे की, करवीर तालुक्यातील खुपीरे येथील सरपंच दीपाली जांभळे यांनी चूल आणि मूल या घोषवाक्याच्या पलीकडे जाऊन गेल्या दोन वर्षांपासून खुपीरे ग्रामपंचायतला आदर्श गाव निर्माण करणे, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी अविरत प्रयत्न करीत सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेतला आहे. खुपिरे गावामध्ये नवनवीन योजना चालू करणे यामध्ये, प्रामुख्याने विधवा महिलांना एक दिवसीय प्रतिकात्मक सरपंच करून त्या विधवा महिलांना झेंडावंदन करण्याचा मान दिला. गावातील मुली लग्न करून सासरी जाताना मुलींना ग्रामपंचायतीतर्फे माहेरची साडी भेट देण्याची योजना असो, तसेच शेवटची फुले (लाकूड शेणी) ग्रामपंचायतीची, मोफत ‘शवदहन योजना’ असेल, असे अनेक धोरणात्मक व धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची जागतिक महिला दिनानिमित्त त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

🤙 8080365706