
उभं राहून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण उभ्यानेच पाणी पितात, मग ते ऑफीस असो किंवा घर. पण ही सवय वेळीच मोडायला हवी.

उभे राहून किंवा पडून राहून पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी लोकांनी बसून पाणी प्यावे. उभं राहून पाणी प्यायल्याने पाण्यातील खनिजे पचनसंस्थेपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. ज्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकते.”उभं राहून पाणी प्यायल्याने किडनी आणि लिव्हरचे नुकसान होते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते. किडनी शरीरात फिल्टरसारखे काम करते, त्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास, शरीराची संपूर्ण यंत्रणा बिघडू शकते. उभं राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुस आणि हृदयाचे नुकसान होते. यामुळे सांधेदुखी आणि हाडांच्या इतर समस्या उद्भवू शकतात. यासह मज्जासंस्थेवरही परिणाम होतो.”पाणी नेहमी बसून आणि आरामात प्यावे. पाण्याचे छोटे घोट घेत प्यावे. पाणी हळू हळू प्यायल्याने शरीराला फायदा होतो. असे केल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइटचे संतुलन चांगले राहते, यासह शरीराला आवश्यक खनिजे मिळतात. एका दिवसात २ ते ३ लिटर आवश्यक पाणी प्यावे. पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते व सर्व अवयव निरोगी ठेवते.
