
गारगोटी : राधानगरी विधानसभा मतदार संघातील राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – २ अंतर्गत मतदारसंघातील २४. ४० कि.मी. रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी १८ कोटी ७ लाख रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, यापूर्वीही राज्य शासनाच्या विविध विकासाभिमुख योजनांतून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील विविध रस्ते सुधारणा आणि बांधणीसाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे. मतदारसंघाच्या धोरणात्मक प्रगतीसाठी आणि पायाभूत विकासासाठी केंद्रस्थानी असणाऱ्या रस्ते विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. मतदार संघातील प्रत्येक गावाचा समतोल आणि व्यापक पद्धतीने विकास व्हावा याकडे आपले वैयक्तिक लक्ष असून यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यामध्ये राधानगरी तालुक्यातील बुरंबाळी ते तारळे खुर्द रस्ता 3.780 कि.मी. 3 कोटी 23 लाख, राजापूर फाटा ते राजापूर गाव रस्ता 4.380 कि.मी. 2 कोटी 65 लाख, मेन रोड भटवाडी ते भटवाडी (ओलवण) रस्ता 2.720 कि.मी. 2 कोटी 5 लाख, फेजिवडे ते भोसलेवाडी रस्ता 2.650 कि.मी. 1 कोटी 84 लाख आदी कामांचा समावेश आहे.यामध्ये भुदरगड तालुक्यातील भालेकरवाडी फाटा ते भालेकरवाडी गाव रस्ता 1.000 कि.मी. 90 लाख, पाळ्याचाहुड्डा ते चाफेवाडी रस्ता 2.890 कि.मी. 2 कोटी 37 लाख, मठगांव ते खोतवाडी रस्ता 3.280 कि.मी. 2 कोटी 61 लाख आदी कामांचा समावेश आहे.यामध्ये आजरा तालुक्यातील देवर्डे फाटा ते देवर्डे पारेवाडी रस्ता 1.800 कि.मी. 1 कोटी 31 लाख, पेरणोली ते नावलकरवाडी रस्ता 1.900 कि.मी. 2 कोटी आदी कामांचा समावेश आहे.याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांचे सहकार्य लाभले असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.
