
रायगड : ६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडवर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. महाराज छत्रपती झाले. परकिय गुलामगीरीच्या जोखंडातून मातृभूमी स्वतंत्र झाली. या प्रेरणादायी दिवसाचे स्मरण आपल्याला सदैव रहावे, यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य आयोजन ६ जून रोजी प्रतीवर्षी करण्यात येते. या वर्षी म्हणजे ६ जून २०२३ रोजी ३५० वा राज्याभिषेक दिन येत असून, ३५० व्या राज्याभिषेक वर्षास प्रारंभ होत आहे.

६ जून २०२४ रोजी ३५० वर्षे पुर्ण होत आहेत. हे पुर्ण वर्ष “३५० वर्ष पुर्णत्वाचे ” म्हणून साजरे करण्याचे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व आपणा सर्व शिवभक्तांच्या वतीने ठरवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त, दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमींच्या सहकार्याने व सहभागाने ह्या वर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करूयात. तेव्हा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
