तांब्याची बाटली पाणी पिण्यासाठी चांगली पण ती घेताना तांब्याचीच बाटली आहे हे कसं ओळखाल?

पूर्वीच्या काळी पितळ व तांब्याची भांडी वापरली जात असत. सध्या कॉपर बॉटल म्हणजेच तांब्याची बॉटल खरेदी करण्याचा नवा ट्रेंड वाढला आहे. खरं तर तांब्याच्या बाटलीमधून पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, असं मानलं जातं.तांब्यांच्या धातूंपासून तयार झालेली बॉटल निवडण्यासाठी काही टिप्स लक्षांत ठेवू, ज्याच्या मदतीने आपण योग्य कॉपर बॉटल निवडू शकतो.

आपल्याकडील तांब्यांच्या बाटलीचा रंग हा ५ रुपयांचे किंवा १० रुपयांच्या नाण्यांशी मॅच होणारा असेल तर हे अस्सल तांबे आहे, असे समजावे. खऱ्याखुऱ्या तांब्याचा रंग हा धातूंपासून तयार झालेल्या नाण्यांच्या रांगांसारखाच असतो. तांब्याच्या बाटलीचा रंग या नाण्यांच्या रंगाशी मॅच होणारा नसेल किंवा अधिक चमचमता असेल तर हे तांबे अस्सल नाही किंवा भेसळयुक्त आहे असे समजावे. अस्सल तांब्यांची भांडी बराच काळ वापरल्याने त्यांवर एक प्रकारचा हिरवा गंज चढण्यास सुरुवात होते. आपल्याकडील तांब्यांच्या भांड्यांवर जर अशाप्रकारचा हिरवा गंज चढला असेल तर समजावे की हे तांबे खरेखुरे आहे, भेसळयुक्त नाही. तांब्यांची भांडी पुष्कळ काळ वापरल्याने त्या भांड्यांच्या पृष्ठभागांवर आलेली तकाकी, किंवा हिरव्या रंगाचा पातळसर गंज हे तांबे अस्सल असण्याच्या खुणा आहेत. 

🤙 8080365706