उद्यापासून 19 लाख सरकारी कर्मचारी संपावर ; मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा फिस्कटली

मुंबई : नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे तत्काळ भरा अशा विविध मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठकीनंतरही चर्चा फिस्कटल्याने कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

त्यामुळे उद्यापासून राज्यभरातील 19 लाख सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी संप पुकारणार आहेत.सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. सरकारकडून समिती स्थापन करणार असे सांगण्यात येत असले तरी निर्णयाची शाश्वती सरकार देत नसल्याने कर्मचारी संपावर जाणार आहेत.

🤙 8080365706