
उचगांव: उचगाव हे कोल्हापूर पासून अगदी हाकेच्या अंतरावर गाव असून गावाची लोकसंख्या ५० हजाराच्या आसपास असून तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून येथे कष्टकरी सर्व सामान्य नोकरदारवर्ग मोठ्या प्रमाणात असून गावांमध्ये आपली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटूंबातील असून तसेच उचगांव मध्ये खाजगी शाळा ही मोठया प्रमाणात असूनही जिल्हा परिषदेच्या शाळेचा पट ही चांगला आहे. व लोक सहभागातून शाळेच्या भौतिक सुविधा चांगल्या केल्या असूनही जिल्हापरिषदेची शाळा भव्य आणि दिव्य अशी केंद्र शाळा असून त्या शाळेमध्ये गेली सात वर्षे मुख्याध्यापक नसून शाळेतील ३ ते ४ शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच आपली शाळा समानीकरणातून वगळून दोन्ही शाळेला कायमस्वरूपी दोन मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक मिळावे व विद्यार्थ्याचे होणारे शैक्षणिक नुकसान यांबवावे. ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी आहे. तरी प्रशासनाने हे गांभीयाने घ्यावे ही विनंती. या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या(ठाकरे गट) वतीने करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.विजय वसंत यादव यांना देण्यात आले.

यावेळी गटशिक्षण अधिकारी समरजित पाटील, कक्ष अधिकारी भारत शिंदे, शिक्षण विभागाचे अधीक्षक रणजित शिंदे उपस्थित होते.
यावेळी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात बैठक घेऊन पुढील कार्यवाही करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,माजी पंचायत समिती सदस्य तानाजी आंग्रे, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, उंचगाव गावप्रमुख दीपक रेडेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे कृष्णात रेवडे, फेरीवाला संघटनेचे उपतालुकाध्यक्ष बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार,अजित चव्हाण, सुनील चौगुले,अजित पाटील, सचिन नागटीळक, सचिन पोवार, अनिकेत लांडगे, विनोद जाधव आदी उपस्थित होते.
